India Vs Australia : वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात या तीन खेळाडूंचं पुनरागमन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ फेब्रुवारी । बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून दारुण पराभव झाल्यानंतर वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करताना १६ सदस्यीय संघाचं कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेसाठी काही स्टार खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश आहे. त्यासोबत झाय रिचर्डसन आणि मिचेल मार्श हेही संघात परतले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात ही १७ मार्चपासून होणार आहे. जोश हेझलवूड दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही.

 

ऑस्ट्रेलियन संघाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितले की, जोश हेझलवूड या मालिकेत खेळला असता तर चांगले झाले असते. आम्ही इंग्लंडमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण मालिकेपूर्वी पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यामधील तो एक महत्त्वपूर्ण भाग असेल. आरोन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. कर्णधार म्हणून ही त्याची दुसरी मालिका असेल.

एकदिवसीय मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅस्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील उर्वरित सामने
तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च (इंदूर)
चौथा कसोटी सामना ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)
पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च (मुंबई)
दुसरा एकदिवसीय सामना १९ मार्च (विशाखापट्टणम)
तिसरा एकदिवसीय सामना २२ मार्च (चेन्नई)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *