महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ फेब्रुवारी । औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद धाराशीव म्हणून ओळखले जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनेही या दोन्ही शहरांचे नामकरण करण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यास आज अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी देत दोन्ही शहरांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
नक्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो.