WhatsApp चे ‘हे’ नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का ? अत्यंत फायदेशीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp लवकरच ५ नवीन फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. हे पाचही फिचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत.

ब्लॉक शॉर्टकट
ब्लॉक शॉर्टकट या फीचरच्या माध्यमातून नको असलेले कॉन्टॅक्ट ब्लॉक करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे.

चॅट हिस्ट्री मूव्ह करणे
तुम्ही चॅट हिस्ट्री एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजपणे हलवू शकता. हे करण्यासाठी, वापरकर्त्यांना आता गुगल ड्राइव्ह वापरण्याची गरज पडणार नाही.

कॅप्शन फॉरवर्ड
जेव्हा अँड्रॉइड वापरकर्ते एखाद्याला कॅप्शनसह फोटो किंवा व्हिडिओ पाठवतात तेव्हा त्यांना कॅप्शन वेगळे पाठवावे लागते. ही समस्यादेखील आता दूर होईल.

डिटेक्ट टेक्स्ट इन इमेज
कोणत्या छायाचित्रामध्ये टेक्स्ट मेसेज किंवा अक्षरे लिहिलेली आहेत आणि कोणत्यावर नाही, हे WhatsApp च्या नवीन फीचरमध्ये ओळखता येणार आहे. हे नवीन फीचर बीटा व्हर्जनवर दिले जात आहे.

WhatsApp कॅमेरा मोड
WhatsApp कॅमेरा आणखी चांगला बनवण्यासाठी काम करत आहे. सध्या वापरकर्त्यांना व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा बटण दाबून ठेवावे लागते, परंतु नवीन फीचरमध्ये ही समस्याही दूर होईल आणि वापरकर्त्यांचे हात मोकळे राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *