देशातील पहिला ‘रोबोटिक’ हत्ती पाहिलात का? जाणून घ्‍या या मागील कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ फेब्रुवारी । केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजदप्पिल्ली श्री कृष्ण मंदिरात प्रथमच ‘रोबोटिक’ हत्ती ( यांत्रिक हत्ती ) भाविकांच्‍या सेवेत रुजू झाला आहे. मंदिरातील विविध विधी, उत्‍सव आणि अन्‍य कोणत्याही उद्देशासाठी जिंवत हत्ती किंवा अन्‍य प्राणी ठेवू नका किंवा भाड्याने घेऊ नका, असे आवाहन करण्‍यात आले होते. यानंतर ‘पेटा’ इंडियाने अभिनेता पार्वती थिरुवोथू यांच्या सहकार्याने मंदिराला ‘रोबोटिक’ हत्ती भेट दिला. ( Mechanical elephant )


या हत्तीचे नाव इरिन्जादापिल्ली रामन असे ठेवण्‍यात आले आहे. तो साडे दहा फूट उंच आहे. त्‍याचे वजन ८०० किलो आहे. या हत्तीचे डोके, डोळे, तोंड, कान आणि शेपूट हे सर्व विजेवर काम करतात. रविवार २६ फेब्रुवारीला इरिन्जादप्पिल्ली रामन यांचा “नादायरुथल” (देवांना हत्ती अर्पण करण्याचा सोहळा) आयोजित करण्यात आला.

मंदिरात रोबोटिक हत्ती ठेवण्‍यामागील कारण काय?
या संदर्भात ‘पेटा’ने आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, केरळच्‍या मंदिरामधील विविध उत्‍सव हे हत्तीची उपस्‍थिती अनिवार्य आहे. मात्र मानवी बंदिवासात असलेल्‍या हत्तींच्‍या वर्तनात अनेकवेळा हिंसक होते. स्‍वत:ची बंदिवासातून सुटका करण्‍यासाठी हत्ती हिंसक होतात. त्‍यामुळे जिवित वा वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होते. हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सने केलेल्‍या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, केरळमध्ये मागील १५ वर्षांच्‍या कालावधीत बंदिवान हत्तींनी तब्‍बल ५२६ लोकांना ठार केले आहे. हे नुकसान टाळण्‍यासाठी जिंवत हत्तींच्‍या जागी राबोटिक हत्तींचा वापर करण्‍यात यावा, अशी मागणी समोर आली. त्‍यामुळे त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजदप्पिल्ली श्री कृष्ण मंदिरात असा हत्ती सेवेत रुजू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *