अरेरे संतापजनकः वयोवृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला, महिला गंभीर जखमी, मोकाट आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, फिर्यादीची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ फेब्रुवारी । सातारा। जावली तालुक्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. कुंभारगणी गावातील रेशन विक्रत्याने एका वयोवृद्ध महिलेला जबर मारहाण केली आहे. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण तालुका सत्र न्यायालयात गेले. मात्र आरोपींवर पोलिसांनी कठोर कलम न लावता आरोपींना वाचविण्यासाठी क्लोजर रिपोर्ट देऊन कोर्टातून आरोपींना जामीन मिळवून दिला. परिणामी आरोपी मोकाट फिरत असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सध्या फिर्यादी सीमा भिलारे व बबन भिलारे कोर्टाच्या चकरा मारत आहेत. ही घटना 23 ऑगस्ट 2020 रोजी कुंभारगणी,ता. जावली, जि. सातारा या ठिकाणी घडली.

मालन पांडुरंग भिलारे (वय 78) रा. कुंभारगणी, ता. जावली, जि. सातारा. या वयोवृद्ध महिलेची सून सीमा अनिल भिलारे ही संजय जगन्नाथ शेलाटकर रा. कुंभारगणी याच्याकडे रेशन आणायला गेली. यावर मुजोर संजय शेलाटकर म्हणाला, तुम्हाला रेशनिंग देऊ शकत नाही काय करायचे ते करा. यावर मालन भिलारे यांचा मुलगा बबन भिलारे हा विचारणा करावयास गेला असता त्यालाही संजय शेलाटकरकडून उद्धटपणे वागणूक देण्यात आली. त्यानंतर बबन भिलारे याने थेट शिधा पुरवठा कार्यालय गाठून शिधा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबात विचारना केली. संजय शेलाटकरने दिलेल्या वागणूकीबाबत सर्व प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. शिधा पुरवठा अधिकाऱ्याने ताबडतोब रेशन विक्रेता संजय शेलाटकर यांस बोलावून विचारणा केली. यावेळी संजय शेलाटकर हा रेशन देण्यास तयार झाला. मात्र शिधा पुरवठा कार्यालयातून बाहेर जात असताना बबन भिलारे यांस संजय शेलाटकरने टोकले व तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. यावर बबनने काहीच प्रत्युत्तर न देता ते थेट मेढा पोलिसांत गेला. मात्र मेढा पोलिसांनी दोघांमध्ये समझोता घालून हे प्रकरण मिटवले. यावेळी संजय शेलाटकरने देखील रेशन देण्याचे कबूल केले. मात्र दुसऱ्यादिवशी जेव्हा बबनची वहिनी सीमा भिलारे ही रेशनिंग आणायला गेली तेव्हा संजय शेलाटकरने रेशन देण्यास टाळाटाळ केली. वरून रेशन देणार नाही काय करायचे ते करा, अशी उद्धट वागणूक दिली.

त्यानंतर बबन भिलारे रेशन आणायला गेला असता संजय शेलाटकरने त्यालाही अरेरावीची भाषा वापरली. यावर बबन म्हणाला की, शिधा वाटप कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर तसेच पोलिसांसमोर तू रेशन देण्याचे कबूल केले होतेस. आता जर रेशन नाही देत तर तसे मला लिहून दे. याचा राग मनात धरून संजय याचा भाऊ सुधाकर जगन्नाश शेलाटकर हा बबनवर धावून आला. आमच्याकडे लेखी मागतोय. काय वाकडी करायची ती कर. तू लय शहाणा झाला आहेस का. तू पुढपर्यंत जातोस. काय करायचे ते कर. म्हणत बबनला जबर मारहाण केली. मारहाणीचा आवाज ऐकून बबनचा भाऊ अनिल व आई मालन भिलारे हे धावत आले. त्यांनाही सुधाकर याने मारहाण केली. यावेळी सुधाकर याचा चुलता दगडू शेलाटकर हाही मारहाण करावयास आला. यावेळी घरात जावून संजय शेलाटकर याने लोखंडी रॉड आणून मालन भिलारे या वयोवृद्ध महिलेच्या डोक्यावर प्राणघातक वार केल्यामुळे मालन यांना गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर बबन याने गावातील रिक्षा चालक वैभव जाधव याच्यामार्फत मालन यांना मेढा या शहराच्या ठिकाणी खासगी दवाखान्यात उपाचारासाठी नेले. डोक्यातील घाव खोलवर असल्यामुळे खासगी डॉक्टरांना इलाज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तोपर्यंत मेढा पोलिसांत तक्रार दाखल करायला सीमा भिलारे गेल्या असता त्या ठिकाणी आरोपी संजय शेलाटकर याने आधीच पोलिसांना मॅनेज केल्यामुळे एफआयआरमध्ये जे कलम पोलिसांनी लावणे अपेक्षित होते ते न लावता आरोपीला वाचविण्याच्या हेतूने क्लोजर रिपोर्ट देऊन 323, 325, 506, 34 अशी कलम लावण्यात आली. मात्र हे कलम 323, 325, 506, 34 ही कलमे न लावता 307 लावावे, अशी मागणी सीमा भिलारे, बबन भिलारे यांनी वेळोवेळी केली. मात्र आरोपीला मोठी शिक्षा होईल. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी 323, 325, 506, 34 ही सामान्य कलमे लावून सत्र न्यायालयातून जामीन मंजूर करवून घेण्यात आला.

वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर या कलमात वाढ केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र पुढे तसे काहीच झाले नाही. त्यामुळे संजय शेलाटकर सध्या मोकाटच फिरत आहे. त्याला कठोर शासन व्हावे, अशी मागणी सीमा भिलारे व बबन भिलारे यांच्याकडून वारंवार होत आहे.

फिर्यादी सिमा भिलारे आणि बबन भिलारे यांनी 14 ऑक्टोबर 2020 पासून पश्चिम महाराष्ट्र विभागीय पोलीस महाअधिक्षक कोल्हापूर यांच्याकडेही दाद मागितली. त्यानंतर पोलीस महाअधिक्षक कोल्हापूर यांनी सातारा पोलिस अधिकक्ष कार्यालयाला या प्रकरणी चौकशी करून आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली. तसेच वाई विभागीय पोलिस कार्यालयाकडेही दाद मागितली. सातारा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडूनही मेढा पोलिसांना याबाबत योग्य कारवाईचे आदेश दिले. मात्र मेढा पोलिसांनी चौकशी न करता आरोपिंना मोकाट फिरायला अप्रत्यक्ष जणू पाठबळ दिलेय, असा आरोप फिर्यादी सिमा भिलारे व बबन भिलारे यांनी केला आहे. एव्हढ्यावरच न थांबता आम्हाला योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही आमचे कुटुंब पोलिस अधिक्षक कार्यालय सातारासमोर सामूहिक आत्मदहन करण्याच्या पवित्र्यात आहोत, असेही सिमा भिलारे व बबन भिलारे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *