Health In Heat Of Summer : रखरखत्या उन्हाच्या कडाक्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ मार्च । Temperature In summer : अनेक राज्यांमध्ये वेळेआधी गर्मी वाढल्याने अनेकांचे स्वास्थ्य खालवले आहे. दिल्ली-एनसीआर, पटना, कोलकत्ता, लखनऊ, रांची सहित मोठमोठ्या शहरांमध्ये भरपूर तापमान वाढले आहे. थंडीच्या दिवसानंतर एप्रिल महिन्यामध्ये गर्मीचे दिवस सुरू होतात.

परंतु देशाच्या अनेक राज्यांमध्ये आतापासूनच तापमान वाढीस लागले आहे. अशाने स्वास्थ्य संबंधित समस्या वाढतात. डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे आहे की, सामान्य व्यक्तींसोबत, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना बदलता ऋतूचा सामना करावा लागेल.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या मध्यंतरी वसंत ऋतू (Weather) असतो. या वातावरणामध्ये जास्त थंडीही नसते आणि जास्त गर्मी ही नसते. परंतु काही दिवसांपासून देशामध्ये तापमान वाढत चालले आहे आणि त्यामुळे अनेक लोकांची स्थिती खालावली आहे.

या वातावरणामध्ये अनेक व्यक्तींना जुलाब, सर्दी खोकला, डोकेदुखी, वायरल इन्फेक्शन या सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याच स्वास्थ्य संबंधी समस्यांना दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

दिल्ली एनसीआरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ओपिडीमध्ये वायरल संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गाझियाबाद येथे वैशाली सेक्टर 5 मध्ये नर्सिंग होम चालवणारे डॉक्टर अभिषेक कुमार असे सांगतात की, तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे वायरल संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

अशाच या वातावरणामध्ये श्वासोच्छवासाची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढलेली असते. डोकेदुखी, ब्लड प्रेशर, आणि नाकामधून रक्त येण्याची समस्या देखील वाढू लागते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय करा –

डॉक्टर अभिषेक कुमार पुढे सांगतात की, अशा दिवसांमध्ये तुम्हाला अचानक बाहेर उन्हामध्ये जाण्यापासून थांबायचे आहे. जर तुम्हाला रात्री गरम होत असेल तर तुम्ही पंखा स्लो करा. प्रत्येक वेळी हलका गरम कपडा आणि सुद्धा पूर्ण बाह्या असलेला घाला.

तुमच्या आहारात सीजनल फुड्सचा वापर करा. खासकरून टरबूज, संत्री, मोसंबी, या फळांचे सेवन करा. सोबतच सलाडमध्ये काकडी, हिरव्या गार भाज्या, सोबतच आवळ्याचे सेवन देखील करू शकता. फ्रिजमधील पाणी आणि दह्याच्या सेवनापासून वाचा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *