HDFC बँकेच्या ६ लाख युजर्सचा डेटा चोरीला ? रिपोर्टमध्ये दावा; जाणून घ्या नेमकं सत्य काय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० मार्च । एचडीएफसी बँकमध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, HDFC च्या ६ लाख ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. रिपोर्टनुसार, हॅकर्सनी ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक केली आहे आणि ती ‘पॉप्युलर सायबर क्रिमिनल फोरम’वर पोस्ट केली आहे. ही बातमी आल्यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

बँकमधील खातेदारांची चिंता वाढू लागली. अहवालात म्हटले आहे की सायबर गुन्हेगारांनी ग्राहकांची नावे, ईमेल, पत्ते यासह संवेदनशील आर्थिक डेटा लीक केला आहे. हा अहवाल आल्यानंतर बँकेकडून आता यावर उत्तर देण्यात आले आहे. पाहूया काय म्हणाली आहे बँक…

एचडीएफसीने स्पष्टीकरण दिले

या अहवालाला उत्तर देताना बँकेने डेटा लीकचे दावे फेटाळून लावले आहेत. एचडीएफसीने ट्विट करून या अहवालांचे आणि दाव्यांचे खंडन केले. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, HDFC बँकेचा कोणताही डेटा लीक झालेला नाही. बँकेने लिहिले की आमच्या सिस्टममध्ये कोणताही अनधिकृत प्रवेश नव्हता. ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. खातेदारांच्या चिंतेकडे लक्ष वेधून बँकेने लिहिले की बँक प्रणाली आणि बँकिंग इकोसिस्टमवर बँक लक्ष ठेवून आहे. डेटा सुरक्षिततेबाबत आम्ही खूप संवेदनशील आहोत. बँकेने या अहवालांचे दावे फेटाळले आहेत. बँकेच्या या ट्विटनंतर खातेदारांचा तणाव थोडा कमी झाला आहे.

विशेष म्हणजे, बँकेने ग्राहकांकडून फिशिंग घोटाळे झाल्याची तक्रार केली आहे. पॅनकार्ड, केवायसीसाठी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत असल्याची तक्रार बँकेच्या ग्राहकांनी केली आहे. या तक्रारींनंतर बँकांकडून सातत्याने ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले जात आहे. बँकेने ग्राहकांना त्यांचे खाते, पॅन कार्ड, बँक खाते यासारखी संवेदनशील माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन केले आहे. ही माहिती पुरवल्याने ग्राहकांचे नुकसान होऊ शकते हेही बँके सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *