महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । मोरवाडी (म्हाडा ) :- जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कामगार विभाग , महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी स्मार्ट कार्ड व किट (पेट्या ) चे वाटप कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठान म्हाडा मोरवाडी संचालिका सौ. रेणुका दिपक भोजने (गजबरे) यांच्या प्रयत्नातून व बांधकाम कामगार श्रमिक सेना यांच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून स्मार्ट कार्ड व पेट्या वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सौ. सुप्रिया पांडे यांच्या सुरेख महिलांवर आधारित गीताने सुरुवात झाली .
सौ. रेणुका भोजने (गजबरे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणल्या की एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर जेवढा आनंद होतो त्या पेक्षा जास्त आनंद आज यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मला पुरस्कार पेक्षा मोठा वाटतो डाॅ. निलिमा पवार म्हणाल्या श्री दिपक दादा व सौ. रेणुका भोजने हे या भागातील नागरिक समस्या नेहमी सोडवत असतात जसे की पाणी , वीज , रस्त्याची कामे पालिका मार्फत करुन घेतात विविध सामाजिक कार्य करतात रक्तदान व आरोग्य शिबीर , पाणपोई, शासकीय योजना यांच्या लाभ नागरिकांना देतात सौ. मीनाक्षी जाधव म्हणाल्या की सौ. रेणुकाताई व दिपक दादाने आमच्यासाठी खुप मोठे काम केले भविष्यात आम्हां सर्वांना याचा फायदा होणार आहे आमच्या सर्वान कडुन आम्ही रेणुकाताईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत आहोत यावेळी सौ. सुशीला शिंदे सौ. शालिनी पाटील सौ. धनश्री टाकळकर सौ. मनिषा देशमुख सौ. मंदाकिनी वनवे चेअरमन श्री शंकर पाटील बांधकाम कामगार श्रमिक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री दिपक म्हात्रे श्री दिपक भोजने श्री चंद्रकांत मुठाळ प्रविण भोसले , साईनाथ कांबळे उपस्थित होते सौ. सुप्रिया पांडे यांनी केले मनिषा चव्हाण , फरिदा शेख , मीनाक्षी जाधव , सुरेखा भोसले , कांचन भडकुंबे , मसुदा अतार कुसुम सकट , सविता रेवाले , लता दास पुजा चव्हाण , संगीता फडतरे , वनिता मेश्राम लालटोपीनगर मोरवाडी व इतर परिसरातील महिलांना स्मार्ट कार्ड व पेट्या वाटप करण्यात आल्या.