देशात ब्रेन स्ट्रोकमुळे ४ मिनिटाला एकाचा मृत्यू ; आरोग्य तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मार्च । ब्रेन स्ट्रोक हा आजार अतिशय जीवघेणा ठरत आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा धोका असतो. नैराश्य हे ब्रेक स्ट्रोकचे मुख्य कारण आहे. गेल्या तीन वर्षात कोरोना महामारीदरम्यान ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यात भारतात ब्रेन स्ट्रोकमुळे दर ४ मनिटाला एका व्यक्ती मृत्यू होत आहे. यात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) न्यूरोलॉजिस्ट प्रोफेसर एम.व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी दिली आहे.

भारतात दर ४० सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोन होतो आणि दर ४ मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. यामुळे ब्रेन स्ट्रोक हे देशातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरले आहे. तसेच दरवर्षी देशात ब्रेक स्ट्रोकचे जवळपास १ लाख ८५ हजार प्रकरणं नोंदवली जात आहेत. असेही डॉ. श्रीवास्तव म्हणाले. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ब्रेन स्ट्रोक आजाराबाबतची भारतातील स्ठितीची माहिती दिली.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजनुसार (GBD) भारतात ब्रेन स्ट्रोकची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली जात आहेत. हे प्रमाण ६८.६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ७०.९ टक्के आहे. याशिवाय ७७.७ टक्के प्रकरणांमध्ये शारीरिक अपंगत्व येत आहे. ही आकडेवारी भारतासाठी अधिक चिंताजनक आहे.

जीबीडीच्या अहवालानुसार, ५.२ दशलक्ष म्हणजे ३१ टक्के ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे २० वर्षांखालील मुलांमध्ये होत आहेत. भारतात ब्रेन स्ट्रोकच्या विळख्यात सर्वाधिक तरुण आणि मध्यमवयीन मुलं अडकत आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असली तरी देशातील दुर्गम भागात यावर उपचारांसाठी कोणत्याही पुरेश्या सेवा सुविधा नाहीत. देशभरात विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रेन स्ट्रोकवरील उपचारांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत.

दरम्यान दुर्गम भागातील स्ट्रोक उपचारातील कमतरता दूर करण्याचा तंत्रज्ञान हा सोपा मार्ग आहे. यात टेली स्ट्रोक आणि टेलिमेडिसिनचा अवलंब करून आपण ब्रेक स्ट्रोक रुग्णांची काळजी घेऊ शकतो. त्याच्या मदतीने देशातील दुर्गम आणि गरीब भागापर्यंत पोहचू शकतो, असं मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *