युवकांनो आजच अर्ज करा ; १० वी पास ते पदवीधारकांना पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । PMC Recruitment 2023: पुणे शहरात राहणाऱ्या तसेच पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका (PMC) येथे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

ही भरती रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, कंपाउंडर इत्यादी जागांसाठी केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात पालिकेने ६ मार्च २०२३ ला प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.


या पदांसाठी होणार भरती –

ही भरती एकूण ३२० जागांसाठी होणार आहे. (वर्ग I, II आणि III)

पदांची नावे –

रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी
पशुवैद्यकीय अधिकारी
वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय स्वच्छता निरीक्षक
स्वच्छता निरीक्षक
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
कंपाउंडर/औषध निर्माता
वर्गनिहाय रिक्त पदांची संख्या –

वर्ग I – ८

वर्ग II – २३

वर्ग III – २८९

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

उमेदवारांने संबंधित पदांनुसार १० वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं गरजेचं

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरतीबाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी महापालिका भरतीसाठीची अधिकृत बेवसाईट
https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html ला भेट द्या.

पगार –

पद आणि श्रेणीनुसार पगार १९ हजार ९०० ते २ लाख ८७ हजार ७०० रुपयांदरम्यान देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा –

सर्वसाधारण उमेदवार – किमान १८ आणि कमाल ३८ वर्षे

आरक्षित – ४३, ४५ आणि ५५ वर्षे

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – १००० रुपये

मागास प्रवर्गासाठी – ९०० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मार्च २०२३ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *