रिक्षावाल्यांसाठी बातमी : हा प्रयोग केल्यास मिळणार २५ हजाराचे अनुदान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । रिक्षा व्यवसाय करणाऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या रिक्षाधारकांनाच मिळणार आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेवर आर्थिक बोजा पडणार असला तरी पर्यावरणाची हानी रोखली जाणार आहे. शहरातील वायू प्रदूषण कमी होणार आहे. प्रदूषण ही पुणे येथील मोठी समस्या आहे. पुणे शहरात जवळपास 91 हजार रिक्षा असून सध्या त्या सर्व सीएनजीवर आहेत. यापूर्वी सीएनजी रिक्षांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान दुप्पट केले गेले आहे.

पुणे शहरात पर्यावरण संवर्धन तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे पुणे शहरातील ई-वाहनांना ( electric vehicles)चालना मिळणार आहे. पुणे मनपा हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीस नव्याने ई-रिक्षा घेण्यासाठी (rickshaws) महापालिका 25 हजारांचे अनुदान देणार आहे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी ही माहिती दिली. महानगरपालिका या योजनेसाठी 2023-24 च्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करणार आहे.

2018 मध्ये पुण्यातील सर्व रिक्षा सीएनजी झाल्या. मनपाकडून सीएनजी रिक्षांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. त्यानंतर शासनाकडूनच नवीन रिक्षा सीएनजीच्याच असण्याचे धोरण आणण्यात आल्याने महापालिकेने हे अनुदान बंद करण्यात आले होते. आता केंद्रशासन तसेच राज्यशासन प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे पुणे मनपाने रिक्षा वाहतूक ई- वाहनांने करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मान्यता

राज्यातील रिक्षा बाजारात ई- रिक्षा आल्या आहेत. या रिक्षा वापरास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्यता दिलेली आहे. परंतु ई- रिक्षाची किंमत जास्त आहे. त्यामुळे मनपाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा रिक्षाधारकांना फायदा होणार आहे. मात्र, हे अनुदान केवळ नवीन रिक्षांसाठी असणार आहे.

रिक्षा चालकांसाठी कोणत्या योजना?

अपघात झाल्यास विमा, आर्थिक मदत मुलांना शिक्षणासाठी मदत

आरोग्यविषयक विमा रिक्षाचालकांना कर्ज रिक्षाचालकांना पेन्शन

किती आहेत रिक्षा?

पुणे शहर 91 हजार 454 पिंपरी-चिंचवड 26 हजार 600

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *