महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवालायांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने सर्वच हादरून गेले होते. या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत असतात. आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. गायकाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हत्येची कबुली दिली होती. आता या हत्येमागचं कारण सांगत लॉरेन्स बिश्नोईने मोठा गौफायस्फोट केला आहे.
या प्रकरणात प्राथमिक चौकशीत असं समोर आलं होतं, गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आले होते. यात वेगवेगळ्या राज्यांमधून हे शूटर मागवण्यात आले होते. यामध्ये पुण्यातीलही दोन शूटरची नावं समोर आली होती.
दरम्यान आता एबीपी माझाच्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिष्णोईने थेट तुरुंगातून सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या कारणाचा गौप्यस्फोट केला आहे. या रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिष्णोईने खुलासा करत सांगितलं आहे, भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याच्या मते सिद्धू मुसेवाला गाण्यांमध्ये जसा डॉन दिसत होता, तसाच तो खऱ्या आयुष्यात बनण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपण त्याला ठार केल्याचा धक्कादायक खुलासा लॉरेन्सने केला आहे. सिद्धूची हत्या करण्यासाठी त्याने गँगस्टर गोल्डी बरारची मदत घेतल्याचंही म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतल होता. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती.