IND vs AUS ODI: चेन्नई ! भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे होणार रद्द?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । IND vs AUS Chennai Weather Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्या म्हणजेच 22 मार्चला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतासाठी हा सामना ‘करा किंवा मरो’चा असणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे.

WPL 2023 पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! मुंबईला हरवून दिल्ली कॅपिटल्स टॉपवर तर…
तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो. असे झाल्यास तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची भारताची संधी दूर होईल.

सोमवारी चेन्नईमध्ये जोरदार पाऊस झाला. मंगळवारीही चेन्नईत पावसाची शक्यता आहे. चेन्नई येथे उद्या म्हणजेच २२ मार्चला होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यावर पावसाचे सावट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *