अभ्यास करताना झोप लागते? आळस नव्हे, ‘ही’ आहे खरी समस्या..

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । तुम्हाला अभ्यास करता करता झोप लागते का? यातून तुम्ही आळशी आहात हे सिद्ध होत नाही. ही एक समस्या असून यामागे सोबतच एक रंजक शास्त्रीय कारणही आहे. ही समस्या कशी आहे आणि कोणत्या व्यक्तींना यात झोप लागते?

अभ्यास करताना झोप लागण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण अभ्यास करायला सुरूवात करतो तेव्हा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करतो. डोळ्यांचा वापर या प्रक्रियेत सर्वाधिक होत असल्यानं जेव्हा आपण जास्त वेळ अभ्यास करून थकतो तेव्हा आपल्या मेंदूला आपोआप संकेत जातात. जेव्हा जास्त वेळ अभ्यास करून आपले डोळे थकल्यानंतर त्यांच्यावर जास्त ताण पडतो आणि आपल्या डोळ्यातील मांसपेशी या शिथिल होऊ लागतात. तेव्हा आपला मेंदूचं यापुढे अजून वाचन तुमच्याकडून होऊ शकणार नाही याचे संकेत देतो.

कोणत्या व्यक्ती अभ्यास करताना झोपतात?

आपल्यापैंकी अनेक जणांना झोपेचा त्रास होत असेल तर काही जणांना जास्त वेळ झोप लागत असेल अथवा काही जणांना कमी झोप लागत असेल तर अशा लोकांना अभ्यास करताना झोप लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. कामावर जाणाऱ्या लोकांचेही असे होऊ शकते पण यात प्रमाण कमी असते परंतु अभ्यास करायला बसलेल्या विद्यार्थ्यांना झोप लागण्याची शक्यता जास्त असते.

या समस्येचे काय गंभीर परिणाम होतात?

अभ्यास करताना झोप लागणं ही एक गंभीर समस्या आहे. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे याकडे लोकं टिंगळटवाळी म्हणून पाहतात आणि अरे तुला माहितीये आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा, मुलगी आहे ती ना अभ्यास करता करता झोपते… असं बोलून मित्र-मैत्रिणींमध्ये अन् घरी हा विषय फक्त गंमतीचा होऊन जातो. त्यातून आईवडिलही याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत परंतु याचा गंभीर परिणाम मुलांवर होऊ शकतो. जसे की त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य ते उपाय करून या समस्येला दूर करणे आवश्यक आहे.

काय असतात उपाय?

अशावेळी आपलं शरीर हे रिलॅक्स असते आणि फक्त डोळे आणि मेंदूच यावेळी काम करत असतो तेव्हा या क्रियेला प्रोत्साहन मिळू नये म्हणून कधी लोळत पडून अभ्यास करू नका. फक्त अभ्यास करतानाच नाही तर ही समस्या गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हर्समध्येही दिसून येते यामागेही शास्त्रीय कारण तेच आहे.अभ्यास करताना झोप लागणं ही एक गंभीर समस्या आहे. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे याकडे लोकं टिंगळटवाळी म्हणून पाहतात आणि अरे तुला माहितीये आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा, मुलगी आहे ती ना अभ्यास करता करता झोपते… असं बोलून मित्र-मैत्रिणींमध्ये अन् घरी हा विषय फक्त गंमतीचा होऊन जातो. त्यातून आईवडिलही याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत परंतु याचा गंभीर परिणाम मुलांवर होऊ शकतो. जसे की त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य ते उपाय करून या समस्येला दूर करणे आवश्यक आहे.

काय असतात उपाय?

अशावेळी आपलं शरीर हे रिलॅक्स असते आणि फक्त डोळे आणि मेंदूच यावेळी काम करत असतो तेव्हा या क्रियेला प्रोत्साहन मिळू नये म्हणून कधी लोळत पडून अभ्यास करू नका. फक्त अभ्यास करतानाच नाही तर ही समस्या गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हर्समध्येही दिसून येते यामागेही शास्त्रीय कारण तेच आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *