पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल इतक्या पदांसाठी मेगाभरती ; जाणून घ्या माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगाभरती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार आणि त्यामुळे वाढलेला कामाचा ताण लक्षात घेत आकृतिबंधामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. मात्र, आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जुना आकृतीबंध आणि सुधारीत असे मिळन तब्बल १६ हजार ८३८ पदांची निमिर्ती करण्यात आली आहे. या भरतीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.


दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्याला राज्य शासनाने मंजुरीही दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ही पदभरती करण्यात येणार आहे.

मे महिन्यात ‘या’ जागांसाठी भरती –

महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. तर वरील पदासांठीती परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

भरतीसाठीच्या अधिकच्या सविस्तर माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/index.php या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *