महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । मागच्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. खरंतर करोनाचे रूग्ण कमी झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना बाधित आढळले आहेत. तसंच दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सक्रिय रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १९५६ सक्रिय रूग्ण आहेत.
शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात शनिवारी करोनामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
शिष्यवृत्तीचे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाचा वाढता धोका पाहता करोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी ‘लोपीनाविर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिराविर’, ‘फॅविपिरावीर’, ‘अझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लिन’ यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.