Petrol Rate : पेट्रोलचा भडका! 109 रुपयांवर पोहोचलं, डिझेलही शंभरीच्या जवळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ मार्च । जागतिक बाजारात क्रूडच्या वाढत्या किमतींमुळे पुन्हा एकदा दबाव वाढू लागला आहे. गेल्या 24 तासात क्रूड 2 डॉलरपेक्षा महाग झाले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. पेट्रोल डिझेलचा आजच्या दरात बदल झाला असून एक शहरात चक्क 109 रुपये लिटरवर पोहोचलं आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 68 पैशांनी महाग होऊन 109.46 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 62 पैशांनी वाढून 94.61 रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 2 डॉलरपेक्षा जास्त वाढून प्रति बॅरल 77.93 डॉलरवर पोहोचली आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय दर देखील 3 डॉलरने वाढून 72.75 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.65 रुपये लिटर तर डिझेल 89.82 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये 106.31 रुपये प्रति लिटर दर आहेत. डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लिटर आहेत. चेन्नई 102.63 आणि डिझेल 94.24 रुपये झाले आहेत. कोलकातामध्ये हेच दर 106.03 रुपये पेट्रोल प्रति लिटर मिळत आहे. तर डिझेल 92 रुपयांवर आहे.

गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.26 रुपये आणि डिझेल 89.45 रुपये प्रति लिटर आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 109.46 रुपये आणि डिझेल 94.61 रुपये प्रति लिटर झाले आहे.

इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *