पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दिला 5 लाख 51हजाराचा निधी

Spread the love

महाराष्ट्र 24 : सलमान मुल्ला: प्रतिनिधी :-
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिरढोण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शिरढोण येथील सामाजिक तथाशिवसेनेचे कार्यकर्ते नितीन लक्ष्मण यादव पाटील यांनी स्व खर्चातून 551000/- (पाच लाख एकावण हजार रुपये) चा धनादेश पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते ॲड. धनंजय धाबेकर धरशिव , ॲड सत्यवान गपाट वाशी ,सुमंत नाईकवाडे , धम्मपाल गोरे , राम पवार शिरढोण पुणे येथील श्रीमंत शिंदे उपस्थितीत शिल्पकार श्री. उमेश व्हरकट पुणे यांना देण्यात आला. हा पूर्णकृती पुतळा 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त शिराढोणरकर यांना देण्यात येणार आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ही घरावर बसवणारे पाटील कोण आहे*

वयाच्या अवघ्या आठराव्या वर्षी इच्छाशक्तिच्या बळावर केंद्रिय राखीव दलात नोकरीस लागलेल्या नितिन पाटील यांचे सरकारी नोकरीत मन रमेना.जेमतेम दोन-तीन वर्षाची सेवा बजावल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन गाव गाठले नितिनने गावात सुरवातीस हाॕटेल व्यवसाय सुरू केला. घरची अर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही नितिनने घेतलेला निर्णय हा कमालीची जोखीम स्विकारणाराच होता.परंतु प्रचंड इच्छाशक्ति व अंगी असलेल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर हळूहळू व्यवसायात जम बसवण्यास सुरवात केली….. जिद्द, चिकाटी व काटेकोरपणा या गुणाचा अंगीकार करून स्वतःच्या व्यवसायिक कक्षा व सिमा रूंदावून नितिनने आपला चांगलाच जम बसवला. जम बसल्यानंतर स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत जागा खरेदि करून घराचे बांधकाम सुरू केले. तिन मजली घराचे बांधकाम पूर्ण करून याच घराच्या पक्क्या छतावर दीडशे चौरस फूट जागेत चबुतरा तयार करून सहा महिन्यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्या दिवशी म्हणजे 6 जून रोजी नितिन यांनी छ. शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा उभारला आहे.नितिन यांच्या या निर्णयाचे गाव परिसरातील शिवप्रेमी जनतेस प्रचंड कुतूहल आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीच्या माना अभिभानाने नितिन पाटील यांच्या घराच्या दिशेने वळतात यात शंका नाही गावातील भगवंत नगर परिसरात असणाऱ्या देवगिरी या वास्तुवर उभारलेला हा आश्वरूढ पुतळा उभारून जोपासलेली शिनिष्ठा हि येणाऱ्या पिढीस छ. महाराजांचे कार्य व त्यांचा जाज्वल्य इतिहास वारंवार आठवण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही.
याबरोबरच त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी शिराढोणकरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण (लोकार्पण )होणार आहे.समाजात समाजात वातावरण दूषित करण्याचे काय काही मंडळी करत असतात परंतु सर्व समाज एकत्र राहावा यासाठी नितीन पाटील हा तरुण करत असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या या कार्याबद्दल शिराढोण परिसर व सर्व जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *