Weather Updates : पावसाच्या सरी Weekend गाजवणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मार्च । मार्च महिन्याची अखेर होत असतानाच पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमद्ये हवामान काही अंश बदलण्यच्या तयारीत दिसत आहे. बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेण्याचं नाव घेत नसल्यामुळं अवकाळीचं संकट मात्र कायम आहे. यातच काही राज्यांमध्ये तापमानात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 

कुठे पडेल पाऊस…?
दक्षिण भारतामध्ये पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ या भागांत पावसामुळं हवेत गारवा पसरलेला असेल. सर्वत्र हिरवळ बहरून अल्हाददायक वातावरण यामुळं पाहायला मिळेल. महाराष्ट्रातही विदर्भ आणि नजीकचा भाग वगळता राज्यातील बहुतांश भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.

या व्यतिरिक्त पश्चिम बंगालचा किनारपट्टी भाग, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील. सोबतच पावसााच्या सरीही बरसतील. तर, देशाची राजधानी दिल्ली मात्र उष्णतेच्या झळा सोसताना दिसेल.

30 – 31 मार्च पूर्वी दिल्ली आणि नजीकच्या भागांमध्ये उष्णतेची लाट येईल. पण, मार्च महिन्याची अखेर मात्र पावसानं होणार आहे. पुढे काही दिवसांसाठी हेच वातावरण टिकून राहील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *