New rules from April 1 : एप्रिल महिन्यापासून ‘या’ नियमांमधील बदलांमुळे खिशाला फटका बसणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मार्च ।

# अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढं दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी म्हणजेच विशेष ओळखपत्र गरजेचं असणार आहे. हे युडीआयडीच्या पोर्टलवरून त्यांना मिळवला येईल.

# यापुढं सहा अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच वैध ठरणार आहेत. त्यामुळं दागिने खरेदी करताना लक्ष असू द्या.

# नियमाप्रमाणं दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी आणि सीएनजीचे दरही निर्धारित केले जातात. त्यामुळं या दरांतही बदल होऊ शकतात.

# पुढील बदल म्हणजे, विमा पॉलिसीचा प्रीमियम 5 लाखांहून जास्त असल्यास उत्पन्नावर कर लागणार आहे.

# एप्रिल महिन्यात बँक कर्मचाऱ्यांची चांदी आहे. कारण एकदोन नव्हे तब्बल 15 दिवस बँकांना विविध कारणांनी सुट्ट्या मिळणार आहेत. तेव्हा बँकांची कामं ताबडतोब उरकून घ्या.

# एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मारुती, टाटा, होंडा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये दरवाढ लागू करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *