82 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० मार्च । सोने-चांदीची आभुषणे, दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याने एकदा पुन्हा झेप घेतली आहे. सोने महागाईच्या दिशेने आगेकूच करत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात घसरण झाली होती. मंगळवारी पण घसरण झाली होती. आज, गुरुवारी सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) वाढल्या आहेत. एक तोळा सोन्यासाठी 59,820 रुपये तर एक किलो चांदीसाठी 73,000 रुपये मोजावे लागणार आहे. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. चांदीच्या किंमती पण वधारल्या. येत्या काही दिवसात भावात मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
भाव वधारले
आज 30 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वधारले. गुडरिटर्ननुसार, 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली. आज एक तोळा सोन्याचा भाव 54, 850 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात हा भाव 59,820 रुपये झाला. 18 मार्चपासून विचार करता सोन्यात प्रति तोळा सोन्यात चढउतार सुरु आहे.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
गुडरिटर्न्सनुसार,
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.
नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,730 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,,700 रुपये आहे.