प्रथमच 13 भाषांमध्ये होणार IPL कॉमेंट्री:भोजपुरी, पंजाबी व उडिया भाषांचा झाला समावेश; फिंच, स्मिथ आणि मिताली करणार डेब्यू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० मार्च । यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पंजाबी, उडिया आणि भोजपुरी भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे. म्हणजेच आता आयपीएलवर हिंदी, इंग्रजीसह 12 भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर हिंदी, इंग्रजीसह 9 भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे. स्टार टीव्ही आणि जिओ सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये कॉमेंट्री करतील.

शुक्रवारपासून आयपीएलच्या 16व्या हंगामाला सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे.

अनेक दिग्गज क्रिकेटपटू आयपीएलमध्ये अनेक भाषांमध्ये कॉमेंट्रीसाठी जिओ आणि स्टार स्पोर्ट्सवर पदार्पण करतील. यामध्ये मुरली विजय, एस श्रीशांत, युसूफ पठाण, मिताली राज आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.

स्टीव्ह स्मिथ प्रथमच बॅटऐवजी हाती धरणार माईक
स्टारने सुनील गावस्कर, जॅक कॅलिस, केविन पीटरसन, मॅथ्यू हेडन, अ‌ॅरॉन फिंच, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, डॅनियल व्हिटोरी, डॅनी मॉरिसन, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड हसी यांचा इंग्रजी पॅनेलमध्ये समावेश केला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच स्टार ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ संघासाठी बॅटऐवजी माईक हाती घेणार आहेत.

IPL मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ख्रिस गेलचा जिओ सिनेमाच्या इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय आयपीएलमध्ये आपला प्रभाव टाकणारा एबी डिव्हिलियर्स, इऑन मॉर्गन, ब्रेट ली यांचाही इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. पॅनेलमध्ये ग्रॅम स्वान, ग्रॅमी स्मिथ, स्कॉट स्टायरिस, संजना गणेशन, सुप्रिया सिंग, सुहेल चंधोक यांचाही समावेश आहे.

मिताली, सेहवाग करतील हिंदी कॉमेंट्री
हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, इम्रान ताहिर, दीप दास गुप्ता, अजय मेहरा, पद्मजीत सेहरावत, जतीन सप्रू यांचा समावेश आहे.

तर जिओ सिनेमाने आकाश चोप्रा, पार्थिव पटेल, ओवेश शाह, झहीर खान, सुरेश रैना, अनिल कुंबळे, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, निखिल चोप्रा, साबा करीम, अनंत त्यागी, रिद्धिमा पाठक, सुरभी वैद्य, ग्लेन सलदान्हा यांना हिंदी कॉमेंट्रीचे काम दिले आहे.

अतुल वासन, झुलन गोस्वामी, नयन मोंगिया हे देखील कॉमेंट्री करणार केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे हे जिओ सिनेमावर त्यांचे अनुभव मराठीत शेअर करताना दिसतील. तर झुलन गोस्वामी, लक्ष्मीरत्न शुक्ला बंगालीमध्ये आयपीएल कॉमेंट्री करतील. व्यंकटेश प्रसाद कन्नडमध्ये आणि सरनदीप सिंग, अतुल वासन पंजाबीमध्ये जिओ सिनेमासाठी भाष्य करणार आहेत. स्टार मराठीत अमोल मुझुमदार आणि गुजरातीमध्ये नयन मोंगिया सांभाळतील.

59 दिवसांत 74 सामने होतील
59 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल, 7 घरच्या मैदानावर आणि 7 विरोधी संघापासून दूर. 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील. लीग स्टेजनंतर, पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

18 डबल हेडर असतील
स्पर्धेत 18 डबल हेडर असतील म्हणजेच 18 वेळा दिवसातून 2 सामने होतील. या दरम्यान, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना 7:30 वाजता सुरू होईल. 31 मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना आणि त्यानंतर 1 आणि 2 एप्रिल रोजी दोन डबल हेडर होतील.

1 एप्रिल रोजी पंजाब-कोलकाता यांच्यात पहिला सामना तर लखनौ-दिल्ली यांच्यात दुसरा सामना होणार आहे. त्याचवेळी, 2 एप्रिल रोजी सनरायझर्स-राजस्थान यांच्यात पहिला सामना आणि दुसरा सामना बंगळुरू-मुंबई यांच्यात होणार आहे. 8 एप्रिल आणि 6 मे रोजी या स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येतील.

सर्व सामने 12 शहरांमध्ये होणार
या स्पर्धेतील 74 सामने 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. आयपीएल संघांच्या 10 शहरांव्यतिरिक्त गुवाहाटी आणि धर्मशाला येथेही सामने होणार आहेत. गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्स संघाचे घरचे मैदान असेल आणि धरमशाला स्टेडियम हे पंजाबचे घरचे मैदान असेल. आयपीएल संघांची 10 शहरे मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, लखनौ, हैदराबाद, दिल्ली, मोहाली आणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *