महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मार्च । देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानेवाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या ३०१६ येवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १८४ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर रूग्ण बरं होण्याचा दर ९८.१४ टक्के येवढा आहे. रोज कोरोनांच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.
COVID-19 | Maharashtra reports 694 new cases in the state today. No covid death.
Active cases at 3,016. pic.twitter.com/4nfiD4NcCD
— ANI (@ANI) March 30, 2023
दिल्लीव्यतिरिक्त महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रूग्ण असलेले जिल्हे आहेत. तर केरळच्या वायनाडमध्ये कोविड पॉझिटिव्ह दर 14.8% आहे, तर कोट्टायममध्ये 10.5% आहे. त्याचप्रमाणे सांगलीमध्ये 14.6% आणि पुण्यात 11.1% सकारात्मकता दर आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात 10.7% सकारात्मकता दर आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं की, कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे, परंतु दिलासादायक बाब ही आहे की परिस्थिती इतकी बिघडलेली नाही. देशभरातील रुग्णालयांमध्ये अद्याप कोविड रुग्णांची गर्दी दिसत नाही.