“आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले…….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मार्च । भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवेन, अशा आशयाचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार यांनी आज टीव्ही ९ या वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुणे लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केलं. आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

 

अजित पवारांनी वडेट्टीवारांनी सुनावलं
दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावणं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील, असं अजित पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *