अमृतपालसाठी 300 डेऱ्यांत सर्च ऑपरेशन, MP सिमरनजीत म्हणाले – सरेंडर करू नको, पाकला जा, ISI जवळ घेईल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मार्च । वारिस पंजाब देचा म्होरक्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा सलग 14 व्या दिवशीही फरार आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल धार्मिक स्थळांमध्ये लपल्याची खबर आहे. त्यामुळे अमृतसर स्थित सुवर्ण मंदिरासह पंजाबच्या सर्वच धार्मिक स्थळांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पंजाबच्या 300 हून जास्त डेऱ्यांत शोध मोहीम राबवण्यात येत आहे. पोलिसांच्या टार्गेटवर जालंधर, कपूरथला, होशियारपूर व भटिंडातील डेरे आहेत. याकामी ड्रोनचाही वापर केला जात आहे. पोलिस एका स्विफ्ट कारच्या शोधात आहेत. अमृतपाल आपली इनोव्हा होशियारपूरमध्ये सोडून या कारमध्ये फरार झाला होता.

दुसरीकडे, संगरूरचे शिअदच्या (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी अमृतपालला सरेंडर न करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले -त्याने चूक केली. जवळच बॉर्डर होती. नेपाळला जाण्याची काय गरज होती. रावी ओलांडून पाकला जाता आले असते. आम्ही 1984 नंतरही गेलो होतो. जीवन संकटात असेल आणि सरकार असा जुलूम करत असेल तर शिख इतिहासात हे सर्वकाही न्यायोचित आहे.

दुसरीकडे, गुरुवारी 28 तासांत दुसऱ्यांदा अमृतपालचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. त्यात त्याने परदेशात पळून जाणार नसल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला – मी परदेशात पळून जाणार नाही. लवकरच समोर येईल. मी पळपुटा नाही. केवळ बंडखोरीचे दिवस काढत आहे. अमृतपालचा बुधवारीही एक व्हिडिओ उजेडात आला होता. त्यानंतर गुरुवारी एक ऑडिओही जारी झाला होता. अमृतपालचा दुसरा व्हिडिओ कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी, अमेरिकेच्या 8 आयपी अॅड्रेसवरून इंटरनेटवर टाकण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *