सोने खरेदी करताना आजपासून मोठा बदल ; जाणून घ्या सर्व नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ एप्रिल । केंद्र सरकारने सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीसंदर्भात नियम बदलले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आदेशानूसार १ एप्रिलपासून नवीन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोने विकता येणार नाही. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. सामान्य लोकांना सोन्याची शुद्धता समजत नाही. यामुळे खरे सोने समजून चुकीची खरेदी करू नये. यासाठी सोन्याचे हॉलमार्किंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

काय आहे फायदा
हॉलमार्क केलेले सोने ओळखणे सोपे होणार आहे. कारण ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये 12 अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. सोन्यावर 22K916 लिहिले आहे, याचा अर्थ ते 22 कॅरेट सोने आहे आणि ते 91.6% शुद्ध आहे.

चारवरुन सहा आकडी कोड
16 जून 2021 पर्यंत सोन्याचे हॉलमार्किंग आवश्यक नव्हते. हे सोने खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या इच्छेवर अवलंबून होते. तेव्हा HUID क्रमांक 4 अंकांचा होता. यानंतर 1 जुलै 2021 पासून हॉलमार्क क्रमांक 6 अंकी करण्यात आला. आता 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हॉलमार्क फक्त दानिन्यांवरच का
सोने, सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाण्यांसाठी हॉलमार्क असणार आहे. परंतु ज्वेलर्स ग्राहकांकडून हॉलमार्क नसलेले जुने सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाणी खरेदी करु शकतात. ग्राहकांकडे असलेले जुने सोने किंवा जुने हॉलमार्क केलेले दागिने वैध राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच ग्राहक त्यांचे जुने दागिने ज्वेलर्सना विकू शकतात.

काय आहे फायदा
नवीन हॉलमार्क नियमामुळे सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यांना फायदाच आहे. तुम्ही हॉलमार्कसह जुने सोने विकायला गेलात, तर ज्वेलर्स ते कोणत्याही वजावट न करता त्या वेळच्या किमतीत खरेदी करतील.

चांदीसाठी हॉलमार्क आहे का
हॉलमार्कचा नवा नियम सध्या फक्त सोन्यासाठी आहे, तो चांदीसाठी नाही.

मेकींग चार्ज वाढणार का
नवीन नियम लागू झाल्यानंतर मेकिंग चार्जवर काहीच परिणाम होणार नाही. पूर्वीप्रमाणेच मेकिंग चार्ज लागणार आहे, त्यात काही वाढ होणार नाही.

नियम तोडणाऱ्यास शिक्षा काय
हॉलमार्कचा नवीन नियम तोडणाऱ्या ज्वेलर्सना दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड भरावा लागणार आहे. याशिवाय एक वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *