Gold Price : सोने किमतीत बदल; तर चांदी स्वस्त, चेक करा नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ एप्रिल । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचाही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर किंमतीमध्ये मोठा बदल झाला आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोने दर 22 कॅरेटसाठी 54,700 रुपये असून 24 कॅरेटचा दर 59,670 रुपये आहे. दरम्यान, आजपासून सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर अपडेट जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली असताना काल दिल्लीत सराफा बाजारात सोने भाव 59000 च्या पातळीवर बंद झाला. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *