School Summer Vacation: यंदा शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना (corona update) काळात मागील दोन वर्ष अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठं शैक्षणिक नुकसान झालो होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र देखील काही दिवसांत संपणार आहे. पहिली ते नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा 15 एप्रिलपूर्वी संपवली जाणार असून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन 1 मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिली जातील. त्यानंतर शाळांना 2 मे पासून सुट्टी देण्यात येणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीचा विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे उन्हाळी सुट्टीची. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच पूर्ण वर्षभर शाळा सुरळीत सुरू राहिल्या. पण कोरोनामुळे मागील 2 वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे झाले होते. राज्यात आता शाळा सुरू झाल्या आहेत पण कोरोनामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचे आव्हाने शिक्षक आणि शाळेपुढे आहे. याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टी रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालक ही नाराज होते. त्यानंतर आता 2 मे पासून आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दोन हजार 795 तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एक हजार 63 शाळा आहेत. त्याअंतर्गत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास चार लाखापर्यंत आहे. त्या सर्वच मुलांची आता अंतिम सत्र परीक्षा सुरू आहे. खासगी प्राथमिक शाळांनी देखील त्याचे नियोजन केले आहे. 15 एप्रिलनंतर 1 मे पर्यंत शाळा सुरू राहणार आहे. पण परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे शाळांकडून बंधन घातले जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *