महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । अमर रहे, अमर रहे हुतात्मा सुभेदार अजय ढगळे (subhedar ajay dhagale) अशी भावना आज प्रत्येकजण मोरवणे गावात पाेहचताच व्यक्त करीत आहेत. देशशेवा बजावताना वीर मरण आलेल्या सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज (मंगळवार) मोरवणे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यामुळे संपुर्ण माेरवणे गावात माेठ्या संख्येने ग्रामस्थांसह अन्य जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी आहे.
27 मार्चला भारत चीन सीमेवर रस्त्याच्या रेकीसाठी गेलेल्या चमूत सुभेदार अजय ढगळे यांचा समावेश हाेता. भूस्खलनात सुभेदार ढगळे यांना वीर मरण आले. हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव साेमवारी सायंकाळी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने रत्नागिरीत दाखल झाले.
मोरवणे गावात पार्थिव पाेहचताच ग्रामस्थांनी अमर रहे…अमर रहे सुभेदार अजय ढगळे अमर रहे… अशा घाेषणा देत त्यांना अभिवादन केले. आज त्यांच्या निवासस्थाना जवळील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.