महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला दिमाखात सुरुवात झाली. गुजरात आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना झाला. आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी प्रभावित केले. धोनी, पियुष चावला या अनुभवी खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आयपीएलच्या सोळाव्या हंगमानंतर काही खेळाडू निवृत्तीची घोषणा करु शकतात. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असेल. पाहूयात कोणते खेळाडू निवृत्त होऊ शकतात.
महेंद्र सिंह धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम एस धोनी सध्या 41 वर्षाचा आहे. धोनी यंदाच्या हंगमानंतर आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करु शकतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही अचानक निवृत्ती घेतली होती. चार वर्षानंतर चेन्नई घरच्या मैदानावर खेळथ आहे. त्यामुळे चेपॉकच्या अखेरच्या सामन्यात धोनी निवृत्तीची घोषणा करु शकतो.
दिनेश कार्तिक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळणाऱ्या दिनेश कार्तिकचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. 37 वर्षीय दिनेश कार्तिक याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, तर आरसीबी पुढील हंगमापूर्वी कार्तिकला रिलीज करु शकते. अशात कार्तिकची यंदाची कामगिरी कशी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 37 वर्षीय कार्तिक आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर कॉमेंट्री करु शकतो.
शिखर धवन –
पंजाबचा कर्णधार शिखर धवन यंदाच्या हंगमानंतर निवृत्त होऊ शकतो. ३७ वर्षीय शिखर धवन याला गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातूनही वगळण्यात आले आहे. या हंगामानंतर धवन निवृत्तीची घोषणा धवन करु शकते.
डेविड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. उर्वरित हंगमात जर वॉर्नरची कामगिरी चांगली झाली नाही तर दिल्ली वॉर्नरला रिलीज करु शकते. या हंगमानंतर वॉर्नरही निवृत्त होऊ शकतो
अमित मिश्रा
अमित मिश्रा लखनौच्या ताफ्यात आहे. अमित मिश्राने चाळीशी ओलांडली आहे, त्यामुळे हा हंगाम त्याचा अखेरचा असू शकतो.
अंबाती रायडू
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज अंबातू रायडू यंदा निवृत्ती घेऊ शकतो. चार वर्षानंतर चेपॉकच्या स्टेडिअमवर चेन्नई खेळत आहे. 38 वर्षीय रायडू यंदाच्या हंगमानंतर निवृत्तीची घोषणा करु शकतो.
पियुष चावला –
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असणारा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला या हंगामानंतर निवृत्तीची घोषणा करु शकतो.