महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । आयपीएलता पहिला हंगाम 2008 मध्ये झाला होता. मागील पंधरा वर्षात नॉर्थ ईस्ट राज्यात एकही आयपीएल सामना झाला नाही… पण येथील नागरिकांना आता आणखी जास्त वाट पाहण्याची गरज नाही. कारण आयपीएलचे यंदाचे काही सामने आसाममधील गुवाहाटी येथील मैदानावर होणार आहेत. राजस्थान रॉयल्सने गुवाहाटी आपले दुसरे होम ग्राऊंड निवडले आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स आज (5 एप्रिल) पंजाबविरोधात गुवाहाटीच्या मैदानावर दोन हात करणार आहे. त्याशिवाय आठ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान यांच्यातील सामनाही गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार आहे.
राजस्थान रॉयल्सने गुवाहाटीला दुसरे होम ग्राऊंड म्हणून का निवडले ?
पण राजस्थानने गुवाहाटीला आपले दुसरे होम ग्राऊंड म्हणून का निवडले, याबाबत तुम्हाला माहित आहे का? राजस्थान रॉयल्स भारताच्या नॉर्थ ईस्ट भागात क्रिकेटला चालना देऊ इच्छिते. येथील लोकांची क्रिकेटप्रति रुची वाढावी, त्यामुळे राजस्थानने गुवाहाटीला दुसरे होम ग्राऊंड म्हणून निवडले आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान आज पंजाबविरोधात गुवाहाटीत दोन हात करणार आहे. त्याशिवाय दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामनाही गुवाहाटीच्या मैदानावर होणार आहे. आसाम क्रिकेट असोशिएसनचे सचिव देवाजीत सायकिया यांनी राजस्थान संघाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, राजस्थानने गुवाहाटीला आपले दुसरे होम ग्राऊंड मानले, सर्वांचे मनापासून आभार.. राजस्थानच्या या निर्णायामुळे आसाममध्ये क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल.
दरम्यान, याआधी आयपीएल 2020 मध्ये दोन सामने गुवाहाटीच्या मैदानावर होणार होते. पण कोरोना महामारीमुळे आयपीएल दुबाईला हलवण्यात आले.त्यामुळे गुवाहाटीत सामने झाले नाहीत. पण आता पुन्हा एकदा गुवाहाटीत आयपीएलचे सामने होणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान पंजाब आणि दिल्ली यांच्याविरोधातील दोन सामने गुवाहाटीत खेळणार आहे. आज पंजाब आणि राजस्थान यांच्यात लढत होत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) दोन्ही संघ विजयी पॅटर्न मिळवून विजयी पॅटर्न सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. राजस्थान त्यांचा नेट रनरेट कायम ठेवून गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर पंजाब गुणतालिकेत वरच्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यातील विजयानंतर दोन्ही संघाचा हा दुसरा सामना असेल.