Banking Crisis: जगात २००८ सारखी मंदी पुन्हा येणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक कोसळ्यानंतर आर्थिक क्षेत्रात उलथापालथ होत असताना अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन यांनी भागधारकांना लिहलेल्या पत्रात म्हणतात की, ‘हे बँकिंग संकट अद्याप संपलेले नाही आणि ते संपवण्यासाठी नियामकांना नवीन दृष्टीकोनातून भूमिका घेणे आवश्यक आहे. आपण त्याचे परिणाम येत्या काही वर्षांत पाहणार आहोत.

२००८ सारख्या मंदीची स्थिती नाही…
बाजारात मंदीची शक्यता वाढली असली तरी, अलीकडील अर्थ क्षेत्रात घडलेल्या घटना २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाप्रमाणे नाहीत. सध्याचे आर्थिक संकट कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बाजार संध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परंतू बँकांच्या कठोर धोरणांमुळे आर्थिक वातावरण पुन्हा मजबूत होईल, असेही जेमी डिमन यांनी म्हटले.

अमेरिकेतून बँकिंग संकटाला सुरूवात
जागतिक बँकिंग संकटाची सुरुवात अलीकडेच अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेसह झाली. बँकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने ठेवीदारांनी अचानक अब्जावधी डॉलर्स बँकेतून काढले, त्यानंतर यूएस प्राधिकरणाने १० मार्च रोजी बँक बंद करण्याचे आदेश दिले. तर दोन दिवसांनंतर सिग्नेचर बँक ही आणखी एक छोटी बँकही अशाच पद्धतीने बंद पडली.

बँकिंग संकटाचे लोन पोहचले युरोपात
लवकरच हे संकट युरोपात पोहोचले आणि स्वित्झर्लंडची आघाडीची बँक क्रेडिट सुईस देखील कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र, स्विस प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाने यूबीएसने बँक ताब्यात घेण्याचे मान्य केले. छोट्या बँकांवरील ताण पाहता विश्लेषक आणि गुंतवणूकदार असे सुचवत होते की “अयशस्वी होण्यासाठी खूप मोठ्या” श्रेणीतील बँकिंग संस्थांना संकटाचा फायदा होऊ शकतो. जेमी डिमन म्हणतात की लहान बँकांची ताकद देखील संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *