महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । सूर्यनमस्काराचे फायदे
सूर्यनमस्काराने शरीर बळकट होते स्नायू पिळदार होतात यात सर्व शरीराला उत्तम रक्तपुरवठा होतो त्यामुळे हा सर्वांग सूंदर व्यायाम आहे त्याने मरगळ जाऊन काम करण्याची उभारी येते मन प्रसन्न होते.
अरे समर्थ रामदास स्वामी रोज गायत्री उपासनेबरोबर १२००सूर्यनमस्कार घालीत असत त्यांच्या साठी शक्ती बुद्धी चातुर्यासाठी प्रसिद्ध असलेले हनुमंत हेच त्यांचे व्यायाम शिक्षक दैवत होते.
अरे समर्थकाळींन देशातील परिस्थिती बिकट होती परकीय आक्रमणामुळे समाज सैरभैर झाला होता आळशी समाजाला झोपेतून जागे करण्यासाठी बलाची उपासना योग्य होती आणि आजही आहे. शिवाय शत्रूशी लढण्यासाठी तरुण वर्ग हवा होता म्हणून रामदास स्वामींनी मारुती मंदिरे स्थापन करून तरुणांसाठी व्यायामशाळा सुरू केल्या बलवान तरुणांचा उपयोग छत्रपतींना शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने साठी झाला
तरुण वयात बुद्धी बरोबर बलाची उपासना आवश्यक
कोणत्याही काळात बदलत्या सामाजिक परिस्थितीत सत- असत चा संघर्ष चालू राहणार त्यामुळे घराघरांत, समाजात, देशात संघर्ष संकटांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या, समाजाच्या देशाच्या रक्षणासाठी हनुमंता सारख्या संरक्षण मंत्र्याची उपासना आवश्यक आहे. समाजातील बाल, वृद्धांच्या संरक्षणाची जबाबदारी तरुणांवर असते त्यामुळे तरुण वर्गाने शरीर मन आणि मनगट बळकट करायला हवे तर
तुमची पिढी मोबाईल हातात घेऊन जगभरचे ज्ञान मिळवते पण यासगळ्यात तुमची health जी खरी wealth आहे तीच गमावून बसली आहे junk food मुळे तुमची शरीर दिसायला बाहेरून छान वाटत असली तरी आतून पोकळ झाली सीमेवरचा शत्रू असो किवा एखादा आजार त्याच्याशी सामना करायचा तर व्यायाम हवाच .
अरे खा प्या खूप कष्ट करा पण त्याला व्यायामाची जोड द्या म्हणजे शरीर मन निरोगी राहून खरा आनंद समाधान अनुभवता येईल नाहीतर कोविड सारखे आजार वारंवार हल्ला करतील.