Team India: वन डे क्रिकेटमध्ये पहिला चौकार ठोकणारा क्रिकेटर काळाच्या पडद्याआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । टीम इंडियाचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटर सुधीर नाईक यांचे निधन झाले आहे. यामुळे क्रीडा विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी आपल्या राहत्या घरी पडले. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होत. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी ठरली. नाईक यांनी 5 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.

नाईक हे टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौकार मारणारे पहिले फलंदाज ठरले आहेत. सुधीर नाईक यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी इंग्लंड विरुद्ध एडजबस्टन इथे कसोटी पदार्पण केलं होतं. त्यांची कसोटी कारकीर्द ही फारशी मोठी राहिली नाही. त्यांनी 3 कसोटींमधील 6 डावात 141 धावा केल्या. 77 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

तसेच सुधीर नाईक यांनी 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 13 जुलै 1974 रोजी वनडे डेब्यू केला. नाईक यांनी पदार्पणाच्या सामन्यात चौकार ठोकत मोठा कारनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *