पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांना निगडी येथील व्यापारी संघटना ह्यांना भूखंड क्रमांक ८/९ देण्यात यावा …….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । व्यापारी भूखंड देण्यासाठी खुद्द पालकमंत्री चंदकांत दादा पाटील निगडी व्यापारी संघटना ह्यांच्या मदतीला धावून आले त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांना निगडी व्यापारी संघटना ह्यांच्या रस्ता रुंदीकरण मध्ये २००३ मध्ये जागा संपादित केल्या होत्या त्या संदर्भात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी सभा ठराव क्रमांक २६० २८/१०/२००५ रोजी मंजूर करून निगडी व्यापारी संघटना ह्यांना पेठ क्रमांक २४ दुय्यम सेवा भूखंड क्रमांक ८/९ देण्यात आला होता १५ /२/२००६ रोजी दहा लाख रुपये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी चेकने व्यापारी संघटना ह्याची रक्कम जमा करून घेतली होती तो भूखंड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांनी परस्पर बिल्डर ह्यांना विक्री केला होता त्या संदर्भात पालकमंत्री चंदकांत दादा पाटील ह्यांनी लक्ष घालून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांना लेखी पत्राद्वारे निगडी व्यापारी संघटना ह्यांना भूखंड देण्यात यावा म्हणून पत्रव्यवहार केला आहे निगडी व्यापारी संघटना ह्यांना दिलासा मिळाला आहे चंदकांत दादा पाटील ह्यांच्या मदतीमुळे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *