Google Pay अकाउंटमध्ये धनवर्षाव ; कंपनीने सुधारली चूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । दुकानातील छोट्या मोठ्या खरेदीसाठी आपण व्हॅलेटचा वापर करत असतो. मग या व्हॅलेटमधून कॅशबॅकही मिळत असते. आपल्यापैकी अनेक जणांकडे Google Pay असेल. त्यातून तुम्हाला चांगले रिवॉर्ड मिळाले असतील. कॅशबॅकसह खरेदीवर घसघसीत सुटीचा फायदा घेतला असेल. पण अचानक तुमच्या खात्यात हजारो रुपये जमा झाले तर किती आनंद होईल. गुगल पे ने असेच काही केले. काही जणांच्या खात्यात 80,000 रुपये जमा केले. मग Google Pay वापरणाऱ्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी लागलीच आपला आनंद मित्रांना शेअर केला. तुझ्या खात्यातही पैसे आले का? विचारणा केली.

गुगल पेमुळे खात्यात मोठी रक्कम जमा झाली. काही ग्राहकांच्या बँक खात्यात 10 ते 1000 अमेरिकन डॉलर्स जमा करण्यात आले होते. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. काही वेळातच कंपनीने पैसे परत घेण्यास सुरुवात केली. ही चूक कंपनीला समजताच त्यांनी ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. काही वेळातच पैसे काढण्यात आले.


पत्रकाराने केले ट्विट

मिशाल रहमान या परदेशी पत्रकाराने ट्विटरवर लिहिले, “Google Pay सध्या आपल्या वापरकर्त्यांना मोफत पैसे देत आहे असे दिसते. मी नुकतेच Google Pay उघडले आणि मला असे आढळले की मला $46 डॉलर मिळाले. Google Pay उघडा आणि Deals टॅबवर स्वाइप करा. तुम्हाला कोणतेही रिवॉर्ड मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता. मला वाटते ही चूक झाली आहे. मला काही गुगल युजरचा मेसेज आले. त्यांच्या खात्यात US$1072 जमा झाले. तर, दुसऱ्याला $240 मिळाल्याचे सांगितले. दरम्यान गुगल पे मध्ये मिळालेली रक्कम अनेकांनी खर्चही करुन टाकली. आता ही रक्कम परत करण्याची मागणी कंपनी करत आहे.

कंपनीने चूक सुधारली

गुगल पे ला चूक लक्षात येताच दिलेली रक्कम परत काढण्यास सुरुवात केली. या चुकीसाठी कंपनीने मेलही पाठवला आहे. कंपनीने लिहिले, “तुम्हाला हा ईमेल मिळाला आहे कारण तुमच्या Google Pay खात्यात रोख रक्कम जमा झाली आहे. अनेक खात्यांमधून शुल्क परत काढण्यात आले आहे कारण हे चुकून घडले आहे. ज्यांनी हे पैसे खर्च केले आहेत त्यांना पैसे परत केले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *