अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे गोंधळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीवरून घेतलेल्या भूमिकेमुळं काँग्रेस अडचणीत सापडले होते. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. यावरून चर्चेला उधाण आलं होतं, आणि त्यातच आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आता शरद पवार यांनी स्वत: च स्पष्टीकरण दिलं आहे.

‘आम्ही सर्व एकत्र’

राज्यातलं सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, राहूल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होत, पण मला इथे काही कामं होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *