महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । एक किलो बटाट्याचा भाव किती असू शकतो? तीस, पन्नास, शंभर रूपये…पण जर कोणी बटाट्याचा भाव 50 हजार रूपये सांगितला तर विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय. जगात बटाट्याची एक अशी जात आहे त्याला सोन्याचा भाव आहे. या 1 किलो बटाट्यासाठी 40 ते 50 हजार मोजावे लागतात.
ले बोनॉट ही एक बटाट्याची जात आहे. हा बटाटा दुर्लभ असून तो वर्षांतून केवळ दहा दिवस मिळतो. ही बटाट्याची जात फ्रान्सच्या Ile De Noirmoutier द्विपवर केली जाते. याचे पीक केवळ 50मीटर जमिनीवर उगवले जाते. प्राकृतिक रूपाने समुद्रातील शेवाळे आणि शेवाळ्याचा उपयोग केला जातो. हा जगातला सगळ्यात महागडा बटाटा आहे.
ले बोनॉट या बटाट्याची चव लिंबूसारखी असून थोडासा खारटपणा आणि अक्रोडसारखी चव आहे. त्यामुळे हा बटाटा इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. एवढेच नाही तर ही बटाट्याची जात नाजूक प्रकृतीसाठी ओळखला जातो. हे बटाटे सालीसह खाण्याची शिफारस केली जाते. बेटावरील एकूण 10,000 टन बटाटा पिकांपैकी केवळ 100 टन ला बोनेट बटाटे आहेत, ज्यामुळे त्याला उच्च दर मिळतो. हे दुर्मिळ बटाटे काळजीपूर्वक निवडण्यासाठी सुमारे अडिच हजार लोकं सात दिवस गुंतलेले असतात.