महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । आकुर्डी भागातील नाले सफाई वेळोवेळी होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवार दिनांक 12 एप्रिल रोजी आपण नाल्यात बसून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. अ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाययक आरोग्य अधिकारी श्री.साबळे यांनी 7 दिवसात नाला सफाई करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण उपोषण मागे घेतले .
11 तारखेला उपोषण बाबत आरोग्य विभागाला निवेदन दिलयांनातर 12 तारखेला उपोषण दिवशी सकाळीच 25 ते 30 कर्मचारी नाल्यात साफ सफाई करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी 12 तारखेला नाल्यात बसून उपोषण केल्यानंतर आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आला असून काल गुरुवार दिनांक 13 एप्रिल रोजी संत तुकाराम व्यापार संकुल पासून सुरू होणाऱ्या नाल्याची साफ सफाई JCB च्या साहायाने करण्यास सुरुवात झाली आहे.