राज्यात 29,329 रुग्ण कोरोनामुक्त, रविवारी आढळले 2,487 नवे रुग्ण

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – रविवारी राज्यात २,४८७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६७,६५५ झाली आहे. मृतांचा एकूण आकडाही २,२८६ वर गेला आहे. शनिवारी राज्यात १,२४८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. आता राज्यात एकूण २९,३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३६,०३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून रविवारी पुण्यात कोरोनामुळे सहा व्यक्तींचा मृत्यू झाला, तर दिवसभरात कोरोनाबाधितांची संख्या २७१ ने वाढली. रविवारी कोरोना बळींची संख्या गेल्या आठवडाभरातील सर्वांत कमी आहे. १३८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. पुणे शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३७६ आहे. त्यापैकी १७३ रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. ४२ रुग्णांवर व्हेंटिलेटर उपचार सुरू आहेत. नागपुरात काेरोनाचे ५४० रूग्ण, डाॅक्टरचा समावेश: नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ५४० झाली. रविवारी १९ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यत ३६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ११ जणांचा मृत्यू झाला असून १६१ जण उपचार घेत आहे.

अकोल्यातील काेरोना पाॅझिटिव्ह महिलेला मेयोमध्ये उपचारासाठी आणले होते. अकोला येथील आरोग्य यंत्रणेने मात्र, तिचा मुलगा, मुलगी वा नातेवाइकांची टेस्ट केली नव्हती. मेयो उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी ही बाब उघड झाली. मेयोमध्ये मुलीची टेस्ट केली असता ती पाॅझिटिव्ह आली. रविवारी पाॅझिटिव्ह आलेल्या एकूण १९ जणांपैकी १० जण क्वॉरंटाइन सेंटरवर ड्यूटी असलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी आहे. यात एका डाॅक्टरचाही समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात नवे ५९ रुग्ण पाॅझिटिव्ह :

जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णांचा राेज नवा उच्चांक हाेत आहे. शनिवारी रात्री व रविवारी सकाळी १६१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात ९ जणांच्या फेरतपासणी अहवालांचा समावेश असल्याने नव्याने ५९ जण काेराेना पाॅझिटिव्ह अाले अाहेत. माहिती जिल्हा प्रशासनाला ४७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९ निगेटिव्ह तर २२ नवीन व १ फेरतपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यात जळगाव शहरातील १२, जळगाव ग्रामीणचा एक, यावल येथील तीन, अमळनेर व एरंडाेल येथील प्रत्येकी दाेन व भुसावळ व रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *