आमदार संजय बनसोडे (पाणीपुरवठा राज्यमंत्री )यांचा विकासकामाचा धूमधडाका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – उदगीर – बोलें तेसा चाले त्यांची वंदावी पावले या मनी प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री मा.ना. संजय बनसोडे यांनी आपले प्रथमकर्तव्य समजून आपल्या कामाची छाप लोकांच्या मनावर उमटवत आहेत.मा. लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे निधन झाल्या मुळे उदगीर तालुका पोरका झाला होता म्हणावा तसा उदगीर तालुक्याचा विकास झाला नव्हता पण कालांतराने का होईना उदगीर तालुक्याचे सुपुत्र संजय बनसोडे यांना जनतेने विस्थापितांना जुगारून पहिल्याच झटक्यात बहूमतांनी निवडून दिले असल्यामुळे त्यांनी निवडणुकीत जे जे आश्वासने दिली ती पूर्णत्वाकडे घेऊन जात असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यात आपले मत वाया गेले नसल्याचे बोलले जात आहे.

पहिल्यांदाचं निवडून येऊन उशिरा झालेले सत्तास्थपणा त्यात मिळालेले राज्यमंत्री पद मिळालेल्या संधीच योग्य रूपांतर तालुक्यातील बारीक अभ्यास तालुक्यासाठी काम करण्याची महत्वकांक्षेमुळे उदगीर तालुक्यातील विकास कामांचा महामेरू ची घोडदोड उदगीर तालुक्यास सुजलाम सुफलाम करण्यासाठी यावर्षी उदगीर शहराच्या विकासासाठी 21कोटी चा निधी शासनदरबारी सततच्या पाठ पुराव्या मुळे खेचून आणला आहे. या मध्ये नाट्यगृहासाठी 9कोटी, लिंगायतभवन साठी 2कोटी, मराठा व ओ.बी.सी. मुलांच्या वसतिगृहा साठी 6कोटी मुस्लिम शादीखाना साठी 2तर बौद्ध विहारासाठी 2कोटीचा निधी मंजूर केला आहे ही कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत

तसेच उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायतिचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी तालुक्यातील 86ग्रामपंचायतीना महात्मा गांधी राष्टीय रोजगार हमी योजने अंतर्गत 7लाख प्रत्येकी ग्रामपंचायतीना मंजूर करून दिले आहेत. यापूर्वी तालुक्यास भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे यामुळे थोड्या फार प्रमाणात तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ना. संजय बनसोडे नी निवडून आल्यावर सर्वात आधी तालुक्याचा पाणी प्रश्नसोडवण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायते कडून सिंचन विहिरी साठी प्रस्ताव मागून घेण्याचे निर्देश उपजिल्हाअधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना दिले होते. त्या अनुषंगाने वारंवार आढावा बेठका घेऊन तलाठी व ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात.

तालुक्यातील 28ग्रामपंचायतयांनी सिंचन विहिरीचे काम युद्ध पातळीवर चालू असून विहिरी खोदताना लवकरच पाणी लागल्या मुळे 11विहिरीचे कामबंद आहे. ती पाण्याची पातळी कमी झाल्यावर चालू करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यातील देऊळवाडी, नेत्रगाव, टाकळी, हनुमंतवाडी (देवर्जन )भाकसखेडा, येन्की, या गावात मजुरांची मागणीच नसल्यामुळे विहिरी चे काम चालू झाली नाहीत. तर कुमठा, नागलगाव, निडेबन. कूमदाळ (उदगीर )येथील विहिरीची जागा बदलायची असल्यामुळे काम बंद आहे. तोगरी व हेबतपूर येथील दानपत्र आले नसल्यामुळे तर हेर येथील सिंचन विहीर संदर्भात तक्रार आल्याने कामबंद आहे अशी माहिती तहसीलदार श्री. व्येंकटेश मुंडे यांनी दिली आहे. यामुळे आता उदगीर तालुक्याचे लवकरच जिल्यात होईल अशी अश्या आहे असे आमच्या प्रतिनिधी कडे निडेबन ग्रामपंचायतचे सरपंच सुनील सोमवंशी यांनी बोलून दाखवली आहे त्यांच्या सोबत जयवर्धन सोमवंशी, पांडुरंग वाघमारे, ऍड. किरण गायकवाड (हेरकर )आदी उपस्तिथ होते. मोठ्या प्रमाणात शहरात व तालुक्यात विकास कामे चालू झाल्या मुळे जनतेत मा. ना. संजय बनसोडे साहेबानं विषयी समाधान व्यक्त करीत आहे असे कूमदाळचे रहिवाशी जीवन भोसले, शिदोधान भोसले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *