बुलढाणा जिल्ह्यात बँकांनी जास्तीत जास्त पीककर्ज वाटप करावे:पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – मान्सूनपुर्व पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतांची पुर्व मशागत करून खरीप पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. या विषयी आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे बैठक पार पडली, जिल्ह्यात बँकांनी पात्र शेतकऱ्यांना येत्या 15 जुन पर्यंत त्यांच्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पुर्ण करावे, असे सक्त आदेश आज दिले आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश दिले. तसेच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याचे याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वितरण करावे. पीक कर्ज वितरण करताना कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग, मास्क किंवा रूमाल तोंडावर असणे, सॅनीटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुका स्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घेणे, पीक कर्ज कागदपत्रे आदीबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सहज होईल अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *