महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली, लॉकडाउन 5 लागू झाला आहे. पाचवा लॉकडाउन हा अनलॉक 1 असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातही लॉकडाउन पाच साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पुणे शहरात आज कंटेनमेंट झोन्स आणि नियमावली आज जाहीर होणार आहे.
परंतु, आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनलॉक 1 आणि बिगीन अगेन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोन्स आणि जिल्ह्यासाठी नवीन नियमावली आज जाहीर होणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतर राज सरकारने राज्यातील वेगवेगळ्या भागात कसे निर्णय घेता येतील, याबद्दल नियमावली तयार केली आहे. ज्या त्या भागातील परिस्थितीत पाहून निर्णय घेतले जाणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी घोषणा करणार आहे.
5 जूनपासून महात्मा फुले मंडई आणि महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग उघडणार आहेत. तसंच शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा भागासाठीही नवीन नियम लागू होणार आहे. त्याआधी पुण्यातील नागरिकांसाठी सोमवारी एक निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार, पुणेकर आता नियमांचं आणि अटींचं पालन करून बाहेर पडू शकतात. उद्याने, मैदाने यावर मोकळेपणाने त्यांना फिरता येणार आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 150 उद्याने मंगळवार 2 जून पासून खुली व्हायची शक्यता आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्यानं उघडी असतील असं सांगण्यात आलं आहे. पण यावेळी मास्क लावणे आवश्यक असेल. मात्र, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे.
राज्यातील इतर भागात दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकदिवस आड रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं उघडण्यात येणार आहे. आता पुण्यात दुकानांसाठी याच नियमाने उघडण्यास परवानगी मिळणार आहे. याबद्दल निर्णय आज जाहीर होणार आहे.