‘या’ कंपनीने सुरु केले सर्वात लहान कारचे उत्पादन ; १९ एप्रिल रोजी होणार लॉन्च, किंमत फक्त…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यातच आता देशात लहान आकाराच्या कारची डिमांड वाढली आहे. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री झपाट्याने वाढली आहे. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या या सेगमेंटमध्ये त्यांची नवीन वाहने लॉन्च करत आहेत. एमजी मोटर देखील त्यांची Comet EV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की, या कारचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. ही देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार असेल. टाटा मोटर्सच्या Tiago EV सारख्या इलेक्ट्रिक कारशी ती स्पर्धा करेल.

MG Comet EV चे फीचर्स
कंपनीने सांगितले , सुरक्षेसाठी यामध्ये सॉलिड स्टील फ्रेम वापरण्यात आली आहे. जी कारमध्ये एअरबॅगसह येते. यात इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी १०.२५ इंचाचे दोन डिजिटल स्क्रीन मिळणार आहेत. ही कंपनीची देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. यात नॉर्मल आणि सपोर्ट असे दोन ड्रायव्हिंग मोड मिळू शकतात. त्याचा टॉप स्पीड १०० किमी प्रतितास पर्यंत असण्याची शक्यता आहे. Comet EV ही Wuling Air EV ची सुधारित व्हर्जन असल्याचे सांगितले जाते. जे सध्या इंडोनेशिया आणि अन्य देशांमध्ये विकले जाते.

ही भारतातील सर्वात छोटी कार असेल. साइजच्या बाबतीत ही इलेक्ट्रिक कार अल्टो 800 पेक्षा लहान आहे. या कारची लांबी फक्त २.९ मीटर असेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार एकूण पाच रंगांमध्ये सादर करेल. यामध्ये पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये १७.३ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिसू शकतो, ज्याची ड्रायव्हिंग रेंज एका चार्जवर २००-२५० किमी असू शकते. ही छोटी इलेक्ट्रिक कार शहरातील ग्राहकांना लक्ष्य केले जाईल, कारण ही कार तिच्या आकारामुळे गर्दीच्या ठिकाणी चांगला पर्याय असेल.

काय असणार किंमत आणि कधी होणार लॉन्च ?
MG मोटर इंडियाने या Comet EV चे उत्पादन सुरु केले आहे. एमजी मोटर १९ एप्रिल रोजी आपल्या या EV कारचे लॉन्चिंग करणार आहे. एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार १० लाख रुपयांच्या संभाव्य किमतीत सादर केली जाऊ शकते. ही कार लाँच झाल्यानंतर Tata Tiago EV, Tata Tigor EV आणि Citroen EC3 शी स्पर्धा करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *