महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – जिल्ह्यात पुन्हा ५५ करोना बाधितांची वाढ झाल्याने एकूण करोना बाधितांची संख्या १६४२ झाली आहे. तसेच आणखी एका करोन बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या ७९ झाली आहे. एकूण बाधितांपैकी १०४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आता ५१४ बाधितांवर उपचार सुरू आहे.
नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये शहा बाजार येथील १, किराडपुरा २, चंपा चौक १, कटकट गेट १, नारळीबाग १, गणेश कॉलनी १, जवाहर नगर ३, भीम नगर २, हमालवाडी १, शिवशंकर कॉलनी २, नाथ नगर २, ज्योती नगर १, फजलपुरा परिसर १, मिल कॉर्नर १, एन-तीन सिडको १, एमजीएम परिसर १, रोशन गेट १, विशाल नगर, गारखेडा परिसर १, एन-सहा संभाजी कॉलनी ७, समता नगर ५, अंहिसा नगर १, मुकुंदवाडी १, विद्या निकेतन कॉलनी १, न्याय नगर १, बायजीपुरा २, संजय नगर, मुकुंदवाडी ४, विजय नगर २, यशवंत नगर, पैठण १, चंपा चौक, म्हाडा कॉलनी १, नेहरु नगर १, जुना मोंढा नाका परिसर १, अन्य भागातील ३ रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्ण आहेत.