अजिंक्य रहाणे; बॅटिंग बघून गोलंदाजांच्या मनात आला निवृत्तीचा विचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । आयपीएल २०२३साठीच्या मेगा लिलाव जेव्हा अजिंक्य रहाणेचे नाव पुकारण्यात आले तेव्हा कोणीही बोली लावली नाही. चेन्नई सुपर किंग्जने अजिंक्यला ५० लाखांच्या बेस प्राइसवर संघात घेतले. राजस्थान रॉयल्सचे अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या अजिंक्यला संघात का घेतले यावरून चेन्नईचे काही चाहते नाराज देखील दिसले. काहींना तर धक्काच बसला कारण ज्या खेळाडूला भारतीय संघातून काढून टाकले आहे आणि जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नाही त्याला चेन्नईने संघात घेतले तरी का?

क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ञांपर्यंत अनेकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर गेल्या काही दिवसात स्वत: अजिंक्यने दिले. हे उत्तर तोडी नव्हेत तर बॅटने तेही मैदानावर धमाका करून दिले. अजिंक्यला संघात घेण्याचा निर्णय चेन्नईसाठी सोपा नव्हता. पण धोनी हा अनप्रेडिक्टेबल मानला जातो. तो प्लॉन करतो तेव्हा काही ना काही तरी कारण नक्कीच असते. एका बाजूला रहाणे संघातून बाहेर झाला होता आणि आयपीएलमध्ये तो कुठेच फिट बसत नव्हता. रहाणेचे करिअर अखेरच्या टप्प्यात असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत त्याच्यावर दाव लावण्याचे धाडस कोणीच केले नसते. मात्र चेन्नईने दाखवलेल्या विश्वासामुळे अजिंक्यला नवी लाइफलाइन मिळाली.

हंगामातील पहिल्या दोन लढतीत धोनीने अजिंक्यला अंतिम ११ मध्ये घेतले नव्हते. तेव्हा असे वाटले की या हंगामात अजिंक्यला डग आऊटमध्येच बसलेले पाहावे लागले. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात वानखेडे मैदानावर अजिंक्यने वादळी अर्धशतकी खेळी केली. जणू १८ वर्षाचा युवा खेळाडू धुलाई करतोय अशी अजिंक्यने फलंदाजी केली. त्यानंतरच्या प्रत्येक लढतीत अजिंक्यने कमी चेंडूत अधिक धावा केल्या. काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ६ चौकार आणि ५ षटकारांसह २९ चेंडूत नाबाद ७१ धावा ठोकल्या.

अजिंक्य ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ते पाहून वाटत होते की, या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करेल. आयपीएलच्या १६व्या हंगामात अजिंक्यने ५ सामन्यात ५२.२५च्या सरासरीने आणि १९९.०५च्या स्ट्राइक रेटने २०९ धावा केल्या आहेत. यात २ अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने ११ षटकार आणि १४ चौकार मारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *