महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवारी 27 एप्रिल रोजी पुष्य नक्षत्राचा योग तयार होत आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे 12 वर्षांनंतर गुरूने मेष राशीत प्रवेश केला आहे आणि या राशीत गुरूचा उदयही होत आहे. अशा स्थितीत गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग जुळून येणं म्हणजे या दिवसाचं महत्त्व सोन्याहून पिवळं असं असेल. त्यामुळे 27 एप्रिलला होणारा हा योग अक्षय्य तृतीयेइतकाच लाभदायक ठरेल.
अशी करा पूजा –
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू उदित होण्याच्या दिवशी शुभ संयोगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असं केल्यानं नोकरी आणि व्यवसायात अधिक प्रगती होते आणि व्यक्तीला वय, आरोग्य, समृद्धी आणि भौतिक सुखे प्राप्त होतात. या शुभ काळात दूध, दही, मध, तूप, गंगाजल इत्यादींसह पंचामृताने लक्ष्मी-नारायणाची स्नान घालून पूजा करावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे..)