पुण्यात पाणीकपात नाही ; कालवा सल्लागार समिती बैठकीत निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत 15 ते 27 मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात 3.23 टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे 15 जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे. त्यामुळे पुण्यात पाणीकपात होणार नाही.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. निरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भीमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

निरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून, दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत देण्याचे ठरले. निरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या 47.50 टक्के म्हणजेच 22.96 टीएमसी पाणी उपलब्ध असून, उन्हाळी हंगामात निरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी 13.93 टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी 14.78 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार 19 जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *