महाराष्ट्रातील तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?; राज ठाकरेंनी घेतली ५ नावं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहावं, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीकडे लक्ष देण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. दोघांनीही राज ठाकरेंवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत त्यांच्या प्रश्नांचे चेंडू सीमेपार टोलवले.

तुमचे महाराष्ट्रातील आवडते मुख्यमंत्री कोण?, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे आताच मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून ठसा उमटवायला वेळ लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जर समजा प्रभावशाली मुख्यमंत्री पाहिले असतील, ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना देखील प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. मनोहर जोशींच्या काळामध्ये मनोहर जोशींनी आब राखली, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण कामाचा झपाटा जर बघितला तर ते म्हणजे नारायण राणे, असं राज ठाकरेंनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *