Shirdi News: साईभक्तांची होणार गैरसोय; १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । शिर्डीतील साई मंदिर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. (Shirdi Sai Temple will remain closed from may 1 deployment cisf)

कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयास शिर्डीकरांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि शिर्डी ग्रामस्थ अशा संघर्ष चिघळणार आहे.

बुधवारी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत चार विषयांवर अनेकांनी आपापली मते मांडली. या सर्वांची मते विचारात घेऊन सोमवार १ मे रोजी संपूर्ण शिर्डी गाव बंद ठेऊन संध्याकाळी 6 वाजता ग्रामसभा घेण्यात येणार आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?

शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ भिकमांगो आंदोलन केले.

नागरिकांनी CISF नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डी ग्रामस्थ आता १ मे पासून बंद पाळणार आहेत. शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *